मुंबई : सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय बँकेनं आजपासून अनेक बदल लागू केलेत. या बदलांचा फायदा बँकेच्या ३२ करोड खातेधारकांना होणार आहे. यामुळे, तुमच्या खिशावरचा ताण थोडा कमी होण्यास मदत होणार आहे. आजपासून सेवा शुल्काव्यतिरिक्त एसबीआय कडून मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) न राखल्याबद्दल दंडामध्ये बदल केले जात आहेत. याखेरीज बँकेने अनेक बदल केले आहेत जे आजपासून अंमलात येत आहेत. एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहार ऑनलाईन व्यवहार करणे देखील स्वस्त होणार आहे.


किमान शिल्लक रक्कम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शहरी भागात राहणाऱ्या खाते धारकांना ३ हजार रुपये किमान शिल्लक रक्कम असणे गरजेचे आहे. त्यांची रक्कम ७५ टक्क्यांहूनही कमी असेल तर १५ रुपये दंड आणि जीएसटी द्यावी लागेल. ३० सप्टेंबरपर्यंत हा दंड ८० रुपये आणि जीएसटी असा होता. पन्नास ते पंचाहत्तर टक्के कमी रक्कम ठेवणाऱ्यांकडून १२ रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे. ३० सप्टेंबर आधी याऐवजी ६० रुपये आणि जीएसटी आकारला जात असे. ५० टक्क्यांहून कमी रक्कम ठेवल्यास १० रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. 


त्यामुळे तुमचे एसबीआय खाते जर मेट्रो शहरी आणि शहरी भागातील शाखेत असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात क्रमश: ५ हजार आणि ३ हजार रुपये ठेवावे लागतील. १ ऑक्टोबरपासून दोन्हीकडे किमान शिल्लक रक्कम तीन हजार रुपये असणार आहे.