मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरु होण्यास केवळ एक दिवस बाकी आहे. एक एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्येही नवे नियम लागू होणार आहेत. यामुळे देशातील तब्बल २५ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. बँकेने गेल्या काही दिवसांमध्ये खात्यात बॅलन्स मेंटेन न केल्याबद्दल लागणाऱ्या दंडामध्ये कपात केली होती. ही कपात आता १ एप्रिलपासून लागू होणारआ हे. बँकेने दंडामध्ये ७५ टक्क्यांपर्यंत कपात केली होती. ही कपात बचत खात्यांना लागू होणार आहे. यानंतर कोणत्याही ग्राहकांना १५ रुपयांहून अधिक दंड भरावा लागणार नाही. सध्याच्या घडीला हा दंड अधिकाधिक ५० रुपये इतका होता.


कोणत्या शहरात किती होणार कपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो आणि शहरी भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दल दंड ५० रुपयांवरुन १५ रुपये इतका करण्यात आलाय. तर छोट्या शहरांमध्ये हा दंड ४० रुपयांवरुन घटवून १२ रुपये करण्यात आलाय. याप्रमाणेच ग्रामीण भागांमध्ये आता मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दल ४० रुपयांऐवजी १० रुपयांचा दंड बसेल. या दंडामध्ये जीएसटी वेगळा असेल. 


का उचलले हे पाऊल


बँकेचे रिटेल आणि डिजीटल बँकिंगचे एमडी पीके गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या ग्राहकांच्या भावना आणि फीडबॅक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यांच्या मते बँक आपल्या ग्राहकांच्या हितास प्राधान्य देते. बँकेच्या या निर्णयामुळे २५ कोटी खातेधारकांना याचा फायदा होणार आहे. सध्या एसबीआयमध्ये ४१ कोटी बचत खाती आहेत. यातील १६ कोटी खाती प्रधानमंत्री जनधन खाते योजनेंतर्गत खोलण्यात आलीयेत. 


कर्ज केले होते महाग


एसबीआयने गेल्या काही दिवसामध्ये डिपॉझिट रेट आणि लेंडिंग रेटमध्ये वाढ केली होती. नुकतीच एसबीआयने व्याजदर ०.२५ टक्क्यांनी वाढवले. एसबीआयने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित लेंडिंग रेट) दरही वाढवले होते. यामुळे होमलोन, ऑटोलोन आणि पर्सनल लोन महाग झाले होते. 


दंडाचे नवे आणि जुने दर 


शहरी  ब्रांचमध्ये (मंथली अॅव्हरेज बॅलन्स 3000 रुपये) नवा दंड सध्याचा दंड
50% पर्यंत बॅलन्स कमी असल्यास 10 रुपये 30 रुपये
50% हून अधिक आणि 75% पर्यंत बॅलन्स कमी असल्यास 12 रुपये 40 रुपये
75% से अधिक बॅलन्स कमी असल्यास 15 रुपये 50 रुपये
अर्द्ध शहरी शाखामध्ये (मासिक अॅव्हरेज बॅलन्स 2000 रुपये)    
50% पर्यंत बॅलन्स कमी असल्यास 7.50 रुपये    20 रुपये
50% हून अधिक आणि 75% पर्यंत बॅलन्स कमी असल्यास 10 रुपये 30 रुपये
75% से अधिक बॅलन्स कमी असल्यास 12 रुपये 40 रुपये
ग्रामीण ब्रांच मध्ये (मासिक अॅव्हरेज बॅलन्स 1000 रुपये)    
50% पर्यंत बॅलन्स कमी असल्यास 5 रुपये 20 रुपये
50% हून अधिक आणि 75% पर्यंत बॅलन्स कमी असल्यास 7.5 रुपये 30 रुपये
75% से अधिक बॅलन्स कमी असल्यास 10 रुपये 40 रुपये

किती वाढले होते दर


एसबीआयने ३ वर्षांच्या एमसीएलआर दरांमध्ये ८.१० टक्क्यांवरुन ८.३५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते. याप्रमाणे दोन वर्षाच्या एमसीएलआर दरांमध्ये८.०५ टक्क्यांवरुन वाढवून ८.२५ टक्के केले होते. एका वर्षाच्या एमसीएलआर दर ७.९५ टक्क्यांवरुन वाढवून ८.१५ केले होते.