नवी दिल्ली :  देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना दिलासा देणारी नवी घोषणा केली आहे. बँक ग्राहकांना नुकत्याच विलय झालेल्या बँकांचे चेकबूक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे स्टेट बँकेच्या संलग्न सर्व बँका आणि भारतीय महिला बँकांचे जुने चेक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर बुधवारी माहिती दिली. 


एक एप्रिल २०१७ पासून  SBI में स्टेट बँक ऑफ बीकानेर एंड जयपूर (SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ म्हैसूर (SBM), स्टेट बँक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBT)आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँकेत विलिनीकरण झाले. 


 



ही मान्यता देण्यात आल्यानंतर बँकेने सर्व ग्राहकांना विनंती केली की ३१ डिसेंबरपर्यंत नवीन चेकबूकसाठी अर्ज करा.  ३१ डिसेंबरनंतर संलग्न आणि विलिनीकरण झालेल्या बँकांचे चेक चालणार नाहीत. 


नवीन चेकबूकसाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा एटीएममधून अर्ज करू शकता. तसेच शाखेत जाऊन नवीन चेकबूकसाठी अर्ज करू शकतात.