मुंबई : सॉवरेन गोल्ड बॉंड (sovereign gold bond) योजना 16 जुलै पर्यंत सब्सस्क्रिप्शनसाठी खुली आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मते, या सॉवरेन गोल्ड बॉंड योजनेच्या 2021-22 सीरिज IV ची किंमत 4807 रुपये प्रतिग्रॅम आहे. भारत सरकार ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना 50 रुपये प्रतिग्राम सूट देणार आहे. RBI च्या मते गुंतवणूकदारांचे निर्गम मुल्य 4757 रुपये प्रति ग्रॅम सोने असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारतर्फे सुरू असलेल्या गोल्ड इन्वेस्टमेंट स्कीममध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी SBI ने सहा फायदे सांगितले आहे.


1 निश्चित परतावा 
सॉवरेन बॉंडच्या गुंतवणूकदारांना दर वर्षाला 2.5 टक्के व्याज मिळते. हे व्याज सहा महिन्याच्या हफ्ताने दिले जाऊ शकते.


2 कॅपिटल गेन टॅक्सवर सवलत
रिडम्पशनवर कोणतेही कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही.


3 कर्ज सुविधा
 कर्जासाठी कोलॅटरल स्वरूपात वापर करता येईल़.
 
4 सुरक्षित ठेव
 या सोन्याला फिजिकल सोन्यासारखे ठेवण्याची अडचण नसते. त्यामुळे ते सुरक्षित असते. 
 
5 लिक्विडिटी - 

कमोडिटी एक्सचेंजवर ट्रेड करता येते.


6 जीएसटी, मेकिंग चार्जेस लागत नाही.
फिजिकल गोल्डसारखे जीएसटी आणि मेकिंग चार्जेस लागत नाही.