नवी दिल्ली : कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर जोरदार पडसाद उमटताना दिसत आहेत. भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरुप्पा यांना उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपकडे १०४ आमदार आहेत. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण कसे दिले, असा सवाल विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडीएसने उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने निकाल दिलाय तुमच्याकडे बहुमत आहे ना तर उद्याचे बहुमत सिद्ध करा. त्यामुळे राजपाल यांनी यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरुप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, न्यायालयाने ही मुदत कमी करत उद्याच बहुमत सिद्ध करण्यास स्पष्ट आदेश दिलेत. हा राज्यपालांना मोठा दणका असल्याचे म्हटले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, न्यायालयाने भाजपकडे पाठिंबा देणाऱ्या देणाऱ्या आमदारांची यादी मागितली होती. मात्र, भाजपने ही यादी दिलेली नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करु असे न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने तुमच्याकडे बहुमत आहे ना तर उद्याच बहुमत स्थित करा, अशा सूचना केल्यात. भाजपने आपल्यासोबत बहुमताचा आकडा पार होईल, एवढे आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच भाजप वकिलाने कोण आमदार भाजपसोबत आहेत, याची यादी देणे बंधनकारक नसल्याचा देखील युक्तिवाद केला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान भाजपला सल्ला दिला की, तुमच्याकडे बहुमत असेल, तर तुम्ही उद्याच विधिमंडळात बहुमत सिद्ध करा. त्यामुळे येत्या २४ तासाच बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या घडामोडीकडे लक्ष लागलेय.


भाजपला कर्नाटक विधानसभेत सर्वात जास्त १०४ जागा, मिळाल्या आहेत पण बहुमतासाठी भाजपाला ११२ जागा आवश्यक आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. मात्र, निवडुकीनंतर काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत बहुमताचा आकडा पार केला. काँग्रेसच्या ७८ आणि जेडीएस ३८ आणि एका अपक्षाचा पाठिंबा असे विरोधकांकडे संख्याबळ आहे. मात्र, असे असताना राज्यपाल यांनी भाजपला निमंत्रण दिल्याने काँग्रेस आणि जेडीएसने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आमदार वाचवण्याचा आटापिटा सुरू केलेला असला, तरी काँग्रेसचे किमान चार आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेल्लारी जिल्ह्यातल्या विजयनगर आणि कडलगीचे दोन आमदार कालपासून काँग्रेसच्या गटात नाहीत. आनंद सिंह आणि नागेंद्र अशी त्यांची नावं आहेत. त्याचप्रमाणे प्रतापगौडा पाटील, आणि एम वाय पाटील हे दोन आमदारही काँग्रेसला दगा फटका करण्याची शक्यताय. याशिवाय जेडीएसचेही काही आमदार पक्ष सोडून भाजपामध्ये सामील होतील, अशी भाजपला  आशा आहे. 


कर्नाटकात जोरदार घोडेबाजार सुरु आसल्याची चर्चा सुरू असल्यानं आमदार वाचवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं कसोशिचे प्रयत्न सुरू केलेत.  जे.डी.एस आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप कोंग्रेस नेत्यांनी केलाय. या सगळ्या घडामोडीनंतर कोंग्रेसनं सावध पवित्रा घेत आपल्या आमदाराना हैदराबादला हलवलं आहे. तर मुख्यमंत्री येडियुरुप्पा यांनी रिसॉर्टचे संरक्षण काढून घेण्याचे आदेश दिल्यानंतर कर्नाटक कधील रामनगर इथं आसणाऱ्या इगलटन रिसॉर्टमधून आमदारांना राज्याबाहेर काढण्यात आले.