Viral Video : सोशल मीडियावर जगभरातील लोक बादल बरसा बिजुलीवर (badal barsa bijuli) नाचतानाचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत. नेपाळमधील दोन मुलींचा या गाण्यावरचा रिल्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी हा ट्रेंड तुफान फॉलो केला होता. आता या गाण्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहताना तुमची नजर अजिबात हटणार नाही. तिसरीच्या वर्गातील शाळकरी मुलाने या गाण्यावर इतका छान डान्स केला आहे की शिक्षकही नाचू लागले आहेत. या मुलाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेतील कार्यक्रमांमध्ये मुले अनेकदा त्यांच्या नृत्याने आणि त्यांच्या निरागसतेने लोकांची मने जिंकतात. मुलांच्या नृत्याशी संबंधित हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. त्याचे क्यूट एक्सप्रेशन आणि परफेक्ट मूव्ह्स बघून तुमचं मन नक्कीच आनंदी होऊन जाईल. तुमचा 'मूड बूस्टिंग' करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हृदय, मन सर्व आनंदाने भरून जाईल. तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. तुम्ही जिथे असाल तिथे नाचायला सुरुवात कराल.


सोशल मीडिया साइट एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) हा 27 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाळेचा ड्रेस घातलेला एक लहान मुलगा स्टेजवर नाचताना दिसत आहे. 'बादल बरसा बिजुली' या नुकत्याच व्हायरल झालेल्या या गाण्यावर हा मुलगा एका जागी उभा राहून नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील मालदा येथील कृष्णा काली ताल येथील शाळेचा आहे. जिथे शिक्षक दिनानिमित्त एका कार्यक्रमात हा मुलगा स्टेजवर नाचताना दिसत आहे. स्टेजच्या खाली उभी असलेली इतर मुलंही गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सोबत शिक्षकांनाही मुलाचा नाच पाहून स्वतःला आवरता आलं नाही.



 



कसा सुरु झाला ट्रेंड?


'बादल बरसा बिजुली' हे गाणे व्हायरल करण्याचे श्रेय दोन मुलींना जाते. ज्यांनी 14 सेकंदाचा रील बनवला आणि इंस्टाग्रामवर या गाण्याचा अक्षरक्षः पूर आला. त्याची क्रेझ लोकांमध्ये इतकी पसरली की त्याच्या मीम्सला मूळ रीलपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.  पण हे नवीन गाणे नसून 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'कार्तब्य' नावाच्या नेपाळी चित्रपटातील आहे. हा संपूर्ण चित्रपट यूट्यूबवरही उपलब्ध आहे.