नवी दिल्ली : शाळा हे विद्येचे मंदीर असते तर शिक्षक हे गुरू. मात्र काहींना याचा विसर पडलेला दिसतो. शाळेत मुलांवर होणारे अत्याचार आणि त्यामुळे वाढत असलेली असुरक्षितेबद्दल अनेक पालक चिंतेत असताना मध्यप्रदेशातून अजून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.


 व्हिडिओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक शिक्षक वर्गात विद्यार्थ्याकडून पाठीला मसाज करून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, वर्गात शिक्षक जमीनीवर झोपलेले आहेत आणि एक विद्यार्थी त्यांच्या पाठीवर चढून त्यांना मसाज देत आहे.



कोण आहेत हे शिक्षक?


हाती आलेल्या वृत्तानुसार, या शिक्षकाचे नाव हरिशंकर तिवारी आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माझे हात पाय आणि कंबर दुखत असल्याचे शिक्षकाने सांगितले. त्यामुळे विद्यार्थी हात पाय दाबत होता. असे नेहमीच होत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.


शिक्षण मंत्री म्हणाले...


हे प्रकरण समोर आल्यावर राज्य शिक्षण मंत्री दीपक जोशींनी सांगितले की, या प्रकरणी आम्ही डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरकडून संपूर्ण प्रकारणाचा रिपोर्ट मागवला आहे. रिपोर्ट हाती आल्यावर संबंधित शिक्षकाला निलंबित केले जाईल. 



विद्यार्थ्यींनी सांगितले की...


तर विद्यार्थ्यींनी सांगितले की, शिक्षक नेहमीच आमच्याकडून मसाज करून घेतात आणि तक्रार केल्यास मारतात. त्यामुळे भीतीने विद्यार्थी तक्रार करत नाहीत.


यापूर्वीही असे प्रकार उघडकीस


यापूर्वी देखील मध्यप्रदेशमधील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना भांडी घासायाला, झाडू मारायला लावल्याचे व्हिडिओज समोर आले होते.