अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवणुकीच्या दुस-या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमधल्या 93 जागांसाठी जोरात प्रचार सुरू आहे.


जोरदार सभा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि काँग्रेसच्या प्रचाराची सर्व मदार मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर आहे. त्यामुळे दोघांच्याही गेल्या तीन दिवसांपासून दिवसाला चार सभा सुरू आहेत.  शनिवारी सभांमध्ये मोदींनी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचा समाचार घेतला. तर मोदींच्या प्रचारातून विकास आणि भ्रष्टाचार गायब झाला असून ते स्वत:विषयीच बोलू लागल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळं आता अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचे मुद्दे काय असणार याकडे लक्ष लागलंय.


१४ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान


१४ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानात भाग घेतला. गुजरात विधानसभेच्या १८२ जागा असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान झालं. आता दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे.