पुलवामा : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं आहे. यामध्ये एक त्यांच्या म्होरक्या होता. इतर दोघांची ओळख पटणे बाकी आहे. एन्काऊंटरनंतर आजुबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवंतीपोराच्या गोरीपारामध्ये दहशतवादी लपल्याची बातमी सुरक्षारक्षांना मिळाली होती. यानंतर सेनेच्या जवानांनी रात्री उशीरापर्यंत विभागाला घेराव घातला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यामध्ये सुरक्षा जवानांना यश आले असून ३ दहशतवादी ठार झाले. 



याधी शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहेडा येथील अरवानी भागात देखील चकमक झाली. यामध्ये २ दहशतवादी मारले गेले. या उग्रवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलीस जवानास ताब्यात घेतले होते. पण या जवानास सुरक्षित परत आणण्यात आले.