Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले पण त्यांनी हार मानली नाही. एका स्वप्नासाठी त्यांनी आपले अर्धे आयुष्य खर्ची घातले.  अखेर 2021 साली त्यांनी गणितात एमएससी केली.


राजकरन यांच्याकडे ना घर, ना परिवार, ना सेव्हिंग तसेच त्यांच्याकडे स्थिर नोकरीदेखील नाही. पण माझ्याकडे डिग्री आहे, असे ते अभिमानाने सांगतात. 


मी माझे स्वप्न पूर्ण केले पण बाहेर कोणाला सांगितले नाही. मी जिथे नोकरी करत होतो, तिथले मालक आपल्या मुलांना नेहमी सांगायचे, 'यांच्या दृढ संकल्पाकडे बघा, इतक्या वयातही ते शिक्षण घेत आहेत. ते किती मेहनतीने शिक्षण घेत आहेत' 


मी आता नोकरी सोडली आहे, त्यामुळे मी माझे स्वप्न पूर्ण केले असे अभिमानाने सर्वांना सांगू शकतो. खूपवेळा मी निराश झालो. एकदा तर हिम्मत हारलो होतो. तेव्हा 2015 मध्ये माझ्याबद्दल एक बातमी छापून आली. मी 18 व्या प्रयत्नात अयशस्वी झालो तरी प्रयत्न सुरु आहेत, असे त्यात होते. यामुळे माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. टीव्ही चॅनलवाले मला शोधू लागले. आता मागे वळून पाहायचे नाही आणि आपले स्वप्न पूर्ण करायचे, असे मी ठरवल्याचे राजकरन सांगतात.