Seema Haider on Akshay Kumar : पाकिस्तानातून पळून नेपाळच्या मार्गी बेकायदेशीर रित्या भारतात आलेल्या सीमा हैदर आजकाल सतत चर्चेत आहे. सगळ्यांचं लक्ष सीमा हैदरनं वेधलं आहे. प्रत्येक व्यक्तीला सीमा विषयी जाणून घ्यायचं आहे. ती खरंच प्रेमासाठी भारतात आली की भारतात गुप्तहेर म्हणून आली यावर सध्या मोठा वाद सुरु आहे. दरम्यान, आता सीमा हैदरनं राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे याविषयी सीमा बोलली आहे. तर या सगळ्यात तिनं बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमानं या दया याचिकेत म्हटलं आहे की 'मी सचिनसोबत लग्न केलं असून माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे, त्यामुळे मला मी भारताची सून आहे. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे. या कारणामुळे मला भारताचं नागरिकत्व देण्यात द्यावं. प्रेमासाठी मी सीमा पार करून आले आहे आणि त्याच्यासोबतच मला आयुष्य काढायचं आहे. या द्या याचिकेतं सीमानं हीर रांझा, लैला मजनू यांचा उल्लेख केल्याचं म्हटलं आहे, सीमाचा दावा आहे की, तिने हिंदू धर्म स्वीकारला आणि नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात हिंदू विधीनुसार सचिनसोबत लग्न केलं आहे. पुढे याचिकेत सीमानं तिला तिची चार मुलं आणि पती सचिन मीना यांच्यासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट यांचा उल्लेख केला आहे. ते या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असं सीमा आणि तिचे वकील म्हणाले आहेत. 


हेही वाचा : 'तुझ्या वडील, आई आणि बहिणीमुळे तुला ओळखतात नाहीतर...', इब्राहिमचा तो व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त


सीमा आणि सचिन या दोघांमध्ये आठ वर्षांचा फरक असून सीमा सचिनपेक्षा वयानं मोठी आहे. सीमा आता 30 वर्षांची आहे. तर सचिन हा 22 वर्षांचा आहे. सीमा आणि सचिनची ओळख ही ऑनलाइन गेम पबजी खेळताना झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सीमा तिच्या चार मुलांसोबत सचिनसोबत तिचं पुढचं आयुष्य काढण्यासाठी भारतात आली, असं त्या दोघांनी सांगितलं आहे. सीमाला काही दिवसांपूर्वी ATS घेऊन गेले होते आणि तिची चौकशी सुरु होती.