पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा
पाकिस्तानची सीमा हैदर भारतात येऊ हिंदू बनल्यानं पाकिस्तान पिसाळलाय. सीमा हैदरला परत करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही कट्टरवाद्यांनी दिली होती. सिंध प्रांतात नऊ बंदुकधारी कट्टरवाद्यांनी जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला केला.
Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरबाबत (Seema Haider) भारताचे गृहमंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. युपी एटीएसने सीमाची चौकशी केली. ATS चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. युपी एटीएस चौकशीचा अहवाल भारताचे गृहमंत्रालयाला देणार आहे. सीमाने हेरगिरी केली की नाही याबाबतच्या पुराव्यांबाबतची माहिती या अहवालात आहे. गृहमंत्रालय सीमाला परत पाकिस्तानत पाठवण्याचा निर्णय घेणार आहे. सीमाही उत्तर प्रदेशातील प्रियकर सचिन याच्यासाठी भारतात आली आहे.
सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवणार
सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीना यांची यूपी एटीएसकडून होत असलेली चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे. केंद्रीय यंत्रणांनी देखील दोघांचीही चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान, यूपी एटीएसला सीमा हैदरच्या हेरगिरीशी संबंधित कोणतेही पुरावे सापडले नाहीत. गृह विभाग सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेणार आहे. सीमाजवळ दोन व्हिडिओ कॅसेट, 4 मोबाईल फोन, 5 पाकिस्तानी अधिकृत पासपोर्ट आणि एक आधार आणि नाव नसलेला पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. याचा तपास सुरू आहे.
IB, SSB ने देखील केली सीमाची चौकशी
सीमा हैदर सुरुवातीपासून ATSच्या रडारवर होती. ATSच्या नोएडा युनिटने सीमा हैदरला ताब्यात घेतले. सोमवारी युपी एटीएसने 8 तास सीमाची चौकशी केली. सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात (Pakistan Army) असल्याने हेरगिरीचा संशय व्यक्त केला जात होता. ATS ने मंगळवारी पुन्हा एकदा सीमा, सचिन आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावले होते. सीमा हैदर सैनिकांनाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची अशी माहिती तपासात समोर आल्याने तिच्या अडचणी वाढल्या होत्या. एटीएसने सीमा हैदरची सर्व सोशल मीडिया अकाऊंटही तपासले होते. सीमा बिहारच्या सीतामढी बॉर्डरला क्रॉस करुन नेपाळमार्गे भारतात आली होती. गुप्तचर विभागाने SSB कडून रिपोर्ट मागवला.
प्रेमासाठी भारतात आली
पाकिस्तानी वंशाची सीमा हैदर तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात पोहोचली होती. उत्तर प्रदेशातील सचिन मीणा आणि पाकिस्तानी महिला सीमा गुलाम हैदर 2020 मध्ये ऑनलाइन गेम PUBG द्वारे एकमेकांच्या संपर्कात आले. 15 दिवसांच्या या भेटीत दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. यानंतर त्यांच्यात संभाषण होऊन प्रेमसंबध सुरु झाले.