पंजाबच्या जालंधरमधील सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर हे कुल्हड पिझ्झा कपल सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे हे जोडपं चर्चेत आलं होतं. दरम्यान हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण यावेळी कारण मात्र वेगळं आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मोठया प्रमाणात वाद निर्माण झाला होता. दरम्यान या वादावर आता सेहज अरोराने भाष्य केलं असून, स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा असून, AI च्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे जालंधरचं कुल्हड पिझ्झा कपल चर्चेत आलं होतं. अनेक सोशल मीडिया युजर्स तसंच सेलिब्रिटींना त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती. यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये पंजाबमधील काही मोठी नावंही होती. पण त्यांची हीच प्रसिद्धी त्यांच्या वाटेतील अडचण ठरतीये का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


याचं कारण हे जोडपं पुन्हा एकदा व्हायरल झाला असून, यावेळी कारण वेगळं आहे. जोडप्याचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर सेहज अरोराने इन्स्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात स्पष्टीकरण दिलं आहे. सेहज अरोराने हा व्हिडीओ खोटा असून, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. सेहज अरोराने पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून रेकॉर्ड केला आहे. 


सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरच त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड करत स्पष्टीकरण दिलं. व्हिडीओत सेहज अरोरा याने सांगितलं आहे की, एका युजरने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला AI च्या सहाय्याने तयार केलेला हा व्हिडीओ पाठवला आणि त्याच्या मोबदल्यात पैसे मागितले. दरम्यान आपण नकार दिल्यानंतर हा व्हिडीओ लीक करण्यात आला असा त्यांचा आरोप आहे. या व्हिडीओमुळे आपल्याला कशाप्रकारे मानसिक त्रास सहन करावा लागला याबद्दलही त्यांनी व्हिडीओत सांगितलं आहे. 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. पण अद्याप याप्रकरणी अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.