कानपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशीना फित कापायला कात्री मिळाली नाही आणि ते चांगलेच संतापले. कानपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोलर पॅनलच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे असलेल्या जोशी यांनी फित कापण्यासाठी अधिका-यांकडे कात्री मागितली तर अधिका-यांमध्ये सावळा गोंधळ दिसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कात्री न मिळाल्याने चिडलेल्या मुरली मनोहर जोशी यांनी अखेर उदघाटन करण्यास नकार देत रिबनच उखडून टाकली. नंतर कात्री आली पण मुरली मनोहर जोशी उदघाटन न करताच निघून गेले. मुरली मनोहर जोशी याअगोदरही अनेक प्रसंगामध्ये भडकल्याचे प्रकार घडले आहेत.