Share Market: सेंसेक्स पहिल्यांदा 52 हजारांवर; निफ्टीचा नवा विक्रम
कोरोना महामारीनंतर मोठा बदल
मुंबई : भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. सेंसेक्स आज पहिल्यांदा 52 हजारांवर पोहोचला आहे. शेअर बाजारात अच्छे दिन आले आहेत. शेअर मार्केट आज सुरू होताच या वर्षातला नवा रेकॉर्ड केला आहे. आज इंट्रा डे मध्ये सेन्सेक्स 52052 वर पोहोचला आहे. सेंसेक्स 485 अंकांच्या तेजीसह 52110 अंकांवर व्यापार करत आहे. सेंसेक्सने देखील नवा विक्रम नोंदवल्या आहे. निफ्टीमध्ये देखील तेजी दिसून आहे.
निफ्टी 136 अंकांसह 15300 अंकांवर व्यापार करत आहे. निफ्टी पहिल्य़ांदा 15300च्या वर पोहोचला आहे. पहिल्यांदा निफ्टीने इतका उच्चांक गाठला आहे. आज इंट्रा डे मध्ये निफ्टीने 15314 च्या विक्रमी नोंद केली आहे. निफ्टी देखील 36723 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
याआधी सेंसेक्सने 5 फेब्रुवारी 2021मध्ये 51 हजारांची पातळी पार केली. म्हणजे फक्त 10 दिवसांत आणि 7 व्यापार सत्रात 1000 अंकांची कमाई केली. बजेटनंतर सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये कमालीचे बदल झाले. परिणामी आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.
सेंसेक्सचा प्रवास
तारीख सेंसेक्स
21 जानेवारी 2021 50,184
05 फेब्रुवारी 2021 51,073
15 फेब्रुवारी 2021 52,110
निफ्टीचा प्रवास
तारीख सेंसेक्स
24 नेव्हेंबर 2021 13,079
05 डिसेंबर 2021 14,024
05 डिसेंबर 2021 15,014