जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदवर वडिलांचे गंभीर आरोप
दहशतवादी कारवायांमध्ये देखील हात असू शकतो असा केला आरोप
नवी दिल्ली : जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदचे वडील अब्दुल रशीद यांनी आपल्या मुलीवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, आपली मुलगी ज्या पद्धतीने भरपूर पैसा खर्च करून एनजीओ चालवित आहे, तेथूनच तिचे दहशतवाद्यांशीही संबंध असू शकतात हे स्पष्ट आहे. केंद्रीय एजन्सींकडे त्यांनी मुलीच्या चौकशीची मागणी केली आहे.
शहला रशीदच्या वडिलांनी म्हटलं की, 'जे लोकं आज एनआयएला टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत. मग ते कोणीही राजकारणी असो किंवा व्यापारी. यांचा कुठेतरी दहशतवादी कारवायांमध्ये देखील हात असू शकतो. तिने असं का केलं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. मी तिला बर्याच वेळा समजावून सांगितले की या सर्व गोष्टींपासून तिने दूर राहावे. परंतु आता मला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. जेएनयूची माजी विद्यार्थिनी असलेली शेहला रशीदचे वडील अब्दुल रशीद यांनी आपल्याला तोंड बंद ठेवण्यासाठी पैशांची ऑफर केली जात असल्याचा देखील आरोप केला आहे.
आपल्या वडिलांनी केलेल्या आरोपावर शहला रशीदने ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
शहलाने म्हटलं की, वडिलांनी व्हिडिओमध्ये जे आरोप केले आहेत. ते जुने प्रकरण आहे. माझ्या वडिलांनी माझी आई, माझी बहिण आणि माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. तो आपल्या पत्नीला मारणारे, दुसऱ्यांना शिवगाळ करणारे व्यक्ती आहेत.' ऐवढंच नाही तर तिने आपल्या वडिलांना भ्रष्टाचारी देखील म्हटलं आहे. तिने म्हटलं की, 'या आरोपानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.'
शहला रशीदने म्हटलं की, 'हा राजकीय नाही तर कौटुंबिक वाद आहे. जेव्हा पासून कोर्टाने त्यांना आमच्या घरापासून लांब राहण्यासाठी सांगितलं आहे. तेव्हापासून ते अशा प्रकारच्या हरकती करुन कायदेशीर प्रक्रियेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.'