मार्च महिन्यात पूर्ण करा ही 5 कामे, अन्यथा भरावा लागणार दंड
Financial Year 2021-22 : 31 मार्चच्या आधी पूर्ण करा ही कामे अन्यथा भरावा लागू शकतो दंड
मुंबई : मार्च महिना आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत महत्त्वाचा असतो. अर्थविषयक काम पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्याची शेवटची तारीख निश्चित केली जाते. अशा परिस्थितीत, हा महिना संपण्यापूर्वी, ज्यांची अंतिम मुदत या महिन्यानंतर संपेल ते सर्व महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्या. कारण नंतर दंड भरावा लागू शकतो. चला जाणून घेऊया ती 5 कामे कोणती आहेत जी या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करणे आवश्यक आहे.
Pan-Aadhar लिंक
तुम्ही अजून तुमचा पॅन नंबर आधारशी लिंक (Pan-Aadhar Link) केला नसेल, तर आता उशीर करू नका. सरकारने पॅनशी आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. यानंतर तुमचे पॅन कार्ड रद्द केले जाईल. यासोबतच आयकर कलम 272बी अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागेल.
बँक खात्याचे KYC अपडेट करा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने KYC Update पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्याच्या अखेरीस तुमचे केवायसी अपडेट न केल्यास तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. केवायसी केवळ बँकेतच नाही तर इतर अनेक अत्यावश्यक सेवांशी संबंधित कामातही महत्त्वाचे असते.
Income Tax Return फाईल करा
आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न (IT Return) भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. ITR उशीरा भरल्यास 5,000 रुपये (एकूण 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी 1000 रुपये) दंड आकारला जाईल.
गुंतवणूक करून कर वाचवण्याची शेवटची संधी
चालू आर्थिक वर्ष 2021-22 हे 31 मार्च रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत, चालू आर्थिक वर्षासाठी कर सवलत फक्त 31 मार्चपर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर उपलब्ध असेल. तुम्ही अद्याप तुमच्या कर-बचत गुंतवणुकीचे नियोजन केले नसेल, तर ते शक्य तितक्या लवकर करा. आर्थिक नियोजकाचा सल्ला घेतल्यानंतर तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक करा. (Investment to save tax)
PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी मध्ये किमान गुंतवणूक करा
जर तुमचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) किंवा सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते असेल आणि तुम्ही या आर्थिक वर्षात यापैकी कोणत्याही खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर 31 मार्चपर्यंत, किमान गुंतवणूक करा. अन्यथा तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल. एकदा खाते निष्क्रिय झाल्यानंतर, पुन्हा सक्रिय करण्यासाठी दंड आकारला जाईल.