रांची: संपूर्ण देशाला हादरणाऱ्या दिल्लीतील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आत्महत्येनंतर आणखी एक प्रकार समोर आला आहे. झारखंडमध्ये सामूहिक आत्महत्येची दुसरी घटना समोर आली आहे. एकाची कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्ये मागचं कारण अजून समोर आलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक महिन्याआधीच हे कुटुंब येथे राहण्यासाठी आले होते. पोलीस या ठिकाणी पोहोचले असून प्रकरणाची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या निवृत्त जवानाचं हे कुटुंब होतं. पोलीस सध्या आजुबाजुच्या लोकांची चौकशी करत आहे. भागलपूरच्या दीपक झा यांचं हे कुटुंब आहे. काही दिवसांपूर्वीच या घरात एका लहान मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पण असं काय झालं की घरातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केली.


आजुबाजुच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री देखील सगळे जण दिसले होते. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण देखील दिसले नाही. पोलिसांनी देखील माहिती दिली की, एकाच कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली आहे. दीपक झा यांची मुलगी शाळेत जाते. सकाळी जेव्हा शाळेची गाडी तिला घेण्यासाठी आली. तेव्हा गाडीचा हॉर्न अनेक वेळा वाजवून देखील घरातून कोणी आलं नाही. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.


परिवारातील 2 जणांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता तर 5 जणांना मृतदेह जमिनीवर होते. पोलीस सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच परिवारातील 11 जणांनी आत्महत्या केली होती. यानंतर हजारीबागमध्ये देखील एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केली होती.