पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये दोन दिवसात सात सभा
नरेंद्र मोदी आज आणि उद्या तब्बल सात सभा घेणार आहेत.
गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरंद्र मोदीं यांचा प्रचाराचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. नरेंद्र मोदी आज आणि उद्या तब्बल सात सभा घेणार आहेत.
दक्षिण गुजरातमधल्या भरूचमध्ये आज पहिली सभा घेणार असून त्यानंतर सौराष्ट्रातल्या सुरेंद्रनगर आणि राजकोटमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत.
उद्या वलसाडमध्ये
उद्या मोदींच्या चार सभा असून केवळ एकच सभा दक्षिण गुजरातमधल्या वलसाडमध्ये आहे. त्यानंतर उर्वरित तीन सभा सौराष्ट्रमध्ये आयोजित केलेल्या आहेत.
स्वामिनारायण मंदीराला भेट
यादरम्यान अहमदाबादजवळच्या स्वामिनारायण मंदीरालाही भेट देणार आहेत. भाजप विकास रॅलीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या जास्तीत जास्त सभा आयोजित करण्यावर भर देत आहे.
मतदानाच्या दुस-या टप्प्यातही मोदींच्या मोठ्या संख्येनं सभा होणार आहेत.