नवी दिल्ली : देशात सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स रॅकेटच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावरून ग्राहकांच्या मनात लज्जा उत्पन्न करून हा गोरखधंदा चालवला जातोय. अशाच एका सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे सेक्स रॅकेटचा चालवण्याचा हा आरोपींचा फंडा एकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दरम्यान हा सेक्स रॅकेट कसा चालवला जात होता? पोलिसांनी कसा या टोळीचा पर्दाफाश केला? ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फरिदाबाद गुन्हे शाखा आणि एनआयटीच्या पथकाला शहरात बिनदिक्कतपणे सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली होती.मात्र पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नव्हता. कसून तपासणीनंतर पोलीसांना आरोपींचे नंबर मिळाले होते. मात्र त्यांचा ठावठिकाणा काही लागत नव्हता.


डमी ग्राहक 
आरोपी हे चालत फिरत सेक्स रॅकेट चालवत होते. त्यामुळे पोलिसांना त्यांचा सुगावा लागत नव्हता. यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीसचं डमी ग्राहक बनले होते. मुख्य हवालदार जवाहर हे डमी ग्राहक बनून टोळीतील सदस्याशी बोलले. यामध्ये
देहव्यापाराचा 6 हजार रुपयात सौदा झाला. यानंतर आरोपीने फोनवर 10 मिनिटांत शहरातील एका गेस्ट हाऊसवर डमी ग्राहकाला पोहोचण्यास सांगितले. मुख्य हवालदार साधे कपडे घालून गेस्ट हाऊसवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी कारमध्ये  बसलेल्या महिलांना 6 हजार रुपये दिले. पैसे घेऊन गाडीत बसलेल्या चार महिला आणि चालकाने पैसे वाटून घेतले.


रंगेहाथ ताब्यात घेतलं 
सर्व आरोपी कारमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर डमी ग्राहकांने टीमला इशारा दिला.आणि फरिदाबाद गुन्हे शाखा सेक्टर-56 आणि एनआयटी पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने टोळीला ताब्यात घेतले. या टोळीत चार महिलांसह एक पुरुष अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून टोळीतील इतर आरोपींचा शोध घेत आहेत. 


असे ओढायचे जाळ्यात 
टोळीचे सदस्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधयचे. त्यानंतर मोबाईल फोन आणि व्हॉट्सअॅप कॉलवर रेट फिक्स करायचे. रेट फिक्स झाल्यानंतर ग्राहकाला गेस्ट हाऊसवर बोलवायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, ते हे काम पाच महिन्यांपासून करत होते. ही टोळी एका ठिकाणी कधीच राहायची नाही. पोलिसांच्या भीतीने कधी दिल्ली तर कधी फरीदाबाद, पलवल आदी शहरांत राहत असे. त्यांच वास्तव्य गेस्टहाऊसमध्ये असायचं. त्यामुळे ते पोलिसांच्य़ा अटकेत यायचे नाही.  


दरम्यान फरिदाबाद पोलिसांनी सेक्स रॅकेटमधील टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. या अटकेत असलेल्या आरोपींचा पोलिस कसून तपास करत आहेत. तसेच या टोळीतील आणखीण सदस्य ताब्यात येतायत का याचा पोलीस तपास करतायत.