मुंबई : स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम (Shabnam will be first women in Independent India to be hanged ) या महिलेनं २००८ साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतींनीही तिचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपांना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही.


मथुरा जेलमध्ये जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच महिला फाशीघर बनवण्यात आलं पण तिथे आत्तापर्यंत कोणाही महिलेला फाशी दिली नाही. मात्र आता इथे शबनमला फासावर लटकवण्यात येईल. पवन जल्लादने दोन वेळा या फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. त्याला त्यात फाशीचं तख्त आणि लिव्हरमध्ये काही दोष जाणवले आहेत. ते तातडीने दुरूस्त केले जात आहेत. बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.



 अमरोहामध्ये राहणारी शबनमने 2008 मध्ये आपल्या प्रियकरासोबत मिळून कुटुंबातील सात जणांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


आतापर्यंत कोणत्याही महिलेला झाली नाही फाशी 


मथुरा कारागृहात 150 वर्षांपूर्वी महिलेकरता फाशीघर तयार करण्यात आलं आहे. मात्र स्वातंत्र्यांनंतर आतापर्यंत कोणत्याही महिलेला फाशी झालेला नाही. डेथ वॉरंट जाहीर होताच शबनमला फाशी दिली जाणार आहे. 


बिहारमधून मागवणार रस्शी


जेल अधिक्षकने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पवन जल्लादने दोन वेळा फाशीघराचं निरिक्षण केलं आहे. पवन जल्लादला तख्ता-लीवरमध्ये काही कमी दिसली. बिहारमधून बक्सर मधून फाशीकरता रस्शी मागवण्यात आली आहे.