अहमदाबाद : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना, गुजरातमध्ये काँग्रेसला आज मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला आज पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यताय. गांधीनगरमध्ये वाघेलांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या वेळी मन मोकळं करीन असं शंकर सिंह वाघेलानी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच वाघेलांनी काँग्रेस नेतृत्वावर सडकून टीका केली होती. त्यामुळे हायकमांड नाराजही झाल्याच्या बातम्या होत्या.. पण वाघेलांची ज्येष्ठता लक्षात घेतला कारवाई झाली नाही..यापुढे मात्र कारवाई करण्यात येईल असं प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटलंय.