नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली मग महाराष्ट्रातही द्या अशी मागणी शरद पवार यांनी मोदींकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरूनही पवारांनी मोदींना विचारणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफी ही उत्तर प्रदेशसाठी होती इतर राज्यांसाठी नव्हती. राज्यातील परिस्थितीवर राज्य सरकार निर्णय घेईल असं उत्तर पंतप्रधानांनी पवारांना दिलं आहे. तसंच मालाचं नुकसान शेतकरी करणार नाही, असंही मोदी म्हणालेत. तसंच सरसकट कर्जमाफी न करण्याचे संकेत मोदींनी दिले आहेत.


मोदी भेटीवर काय म्हणाले शरद पवार?


- हा शेतक-यांचाच संप आहे, राजकीय नाही.


- पोलीस बळाचा वापर केला जात आहे.


- खटले भरले जात आहेत.


- गंभीर गुन्हे लावले जात आहेत.


- महाराष्ट्रात कर्जमाफी करायला पाहीजे.


- स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते.


- भाजपने यात्रा काढली होती त्यात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.


- अल्पभूधारकांचे कर्ज माफ करायचे असेल तर ३ महिने वाट का पाहता ?


- अल्पभूधारांची यादी सरकारकडे उपलब्ध आहे.


- ८० टक्के जमीन जिरायती आहे.


- जिरायती शेती करणा-याच्या हाती काहीच लागणार नाही.


चंद्रकांत पाटील यांना पवारांचं प्रत्युत्तर


- मी कृषी मंत्री असताना पीक कर्जाचा दर १२ वरून ४ टक्क्यांवर आणला.


- चंद्रकांत पाटील यांना माहिती नसेल कारण ते शिक्षकांचे प्रतिनिधी होते.


- शाळेतील धडे यापलीकडे चंद्रकांत पाटील यांना माहिती नाही.