रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांना बनवण्यासाठी राष्ट्रपती निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी प्रशांत किशोर यांनी दिल्लीत बैठका सुरू केल्या असल्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2022 मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. अशावेळी सर्व पक्षांना मान्य असलेला उमेदवार म्हणून शरद पवार यांचं नाव पुढे येत आहे. शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच विरोधी पक्षांची मोट बांधण्याचं काम सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 


पण लोकसभेत भाजपचं बहुमत तर राज्यसभेतही भाजपचे सदस्य वाढले आहेत. अशावेळी भाजपच्या उमेदवाराला मात कशी देणार यावर रणनीती आखली जात आहे.


कालच प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली होती. याआधी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोनवेळा भेट घेतली होती.