Share Market | शेअर बाजारात मोठी घसरण; सेसेक्स 1000 तर निफ्टीत 300 अंकांची पडझड
आशियाई बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज (22 नोव्हेंबर) रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.
मुंबई : आशियाई बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज (22 नोव्हेंबर) रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये गुंतवणूकदारांकडून चौफेर विक्री पाहायला मिळाली.
लार्ज कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पडझड झाली. दुपारपर्यंत सेसेंक्समध्ये 1000 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. दुपारी 1 वाजेपर्यंत बीएससीचा सेसेंक्स 58600 च्या आसपास ट्रेड होत होता. तर एनएससीचा निफ्टीतही 300 अंकाच्या आसपास घसरण दिसून आली. निफ्टी दुपारी 1 वाजेपर्यंत 17400 अंकाच्या आसपास ट्रेड होत होता.
आजच्या ट्रेडिंगमध्ये रिलायन्स, वोडाफोन आयडिया, एअरटेल, PVR, कोटक महिंद्रा बँक, Zomato, Nykaa, Paytm, Sapphire Foods, Cipla, Maruti, Asian Paints, IRCTC आणि कॅडिला हेल्थकेअर यांसारख्या शेअर्सवर लक्ष लक्ष होते.
गो फॅशन IPO च्या सबस्क्रिप्शनसाठी आजचा शेवटचा दिवस
गो फॅशन (इंडिया) IPO सबस्क्राईब करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हा आयपीओ 1014 कोटींचा आहे.
महिलांचे कपडे बनवणारा ब्रॅंड Go Colour चा Go Fashion आयपीओ 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असणार आहे. आयपीओ साधारण 1014 कोटी रुपयांचा असणार आहे.