Share Market Update : आठवड्याच्या सुरवातीला भारतीय शेअर बाजारच्या तेजीला ब्रेक लागला आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1,057 अंकांच्या घसरणीसह 57,776 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 310 अंकांच्या घसरणीसह 17,248 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. एसजीएक्स निफ्टीत 300 अंकांची घसरण झाली. तर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1069 अंकांच्या घसरणीसह 57,753.61  अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 314 अंकांच्या घसरणीसह 17,244.45 अंकांवर व्यवहार करत होता. 


निफ्टीतील स्मॉलकॅप 100, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, रियल्टी या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. आयटी निर्देशांकात 4.20 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, पीएसयू बँक निर्देशांकात 2.51 टक्के णि मेटलमध्ये 2.44 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.  बँक निफ्टीतही दोन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.


आजचे Top 10 शेअर्स कोणते ?


ग्रासिम (GRASIM)


एनटीपीसी (NTPC)


अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)


जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)


टायटन (TITAN)


भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)


हिंदुस्थान एअरोनॉटीक्स लिमिटेड (HAL)


ट्रेंट (TRENT)


भारतीय कंटेनर निगम (CONCOR)


व्होल्टास (VOLTAS)