मुंबई : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना शेअर बाजारावर देखील याचा परिणाम दिसत आहे. सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेंसेक्स 2307 अंकांनी पडलं. शेअर बाजार आज 27608 अंकावर उघडला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज जवळपास 800 अंकांनी घसरला. स्टॉक एक्सचेंज 7945 अंकावर उघडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 9.40 वाजता सेंसेक्स 2775 अंकांनी घसरुन 27,140 अंकावर आला. तर निफ़्टी 7,941 अंकावर पोहोचला. 860 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर फक्त 90 शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली.



याआधी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळाला होता. सेंसेक्स 400 अंकांनी मजबूत झाला होता. निफ्टीमध्ये जवळपास 100 अंकांची वाढ झाली होती. पण काही वेळेतच घसरण ही पाहायला मिळाली.


शुक्रवारी सेंसेक्स 5.75 टक्क्यांनी म्हणजेच 1627.73 अंकांनी मजबूत होत 29,915.96 वर बंद झाला होता. निफ्टी 482 अंकांनी मजबूत होत 8,745 अंकावर राहिला. एक दिवसाआधी तुलना केली तर सेंसेक्स 2200 अंकांनी रिकव्हर होत बंद झाला. तर निफ्टी 685 अंकांनी मजबूत झाला होता.