मुंबई : महिन्याची सुरुवात नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी खास असते. कारण त्यांच्या खात्यात पगाराची रक्कम येते. पण 1 फेब्रुवारीला शेअर मार्केटशी संबंधित लोकांना देखील खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण बजेटच्या आधी सेन्सेक्स 665 अंकांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीमध्येही 180 अंशांची वाढ नोंदवली गेली. शेअर बाजाराला चांगल्या निर्णयांनी बातमी कळाली आहे का ? त्यामुळे यंदाचं बजेट हे शेअर बाजारासाठी सकारात्मक असल्याचे संकेत आहे.


एलटीसीजी संपणार ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार दीर्घकालीन भांडवली नफा ( एलटीसीजी) कर काढून टाकण्याचा विचार करत आहे. यावर ट्विटरवर पोल सुरु करण्यात आला होता. ज्यामध्ये 4610 लोकांनी या मतदानात आपले मत दिले आणि 90% लोकांनी एलटीसीजी बंद करण्याची मागणी केली होती. या करामुळे बाजारात वाढीचा वेग संपला होता.


एलटीसीजी म्हणजे काय?


गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारने एलटीसीजी कर लागू केला होता. या अंतर्गत, एक वर्षानंतर किंवा त्यापेक्षा अधिक वेळेत शेअर विक्री केल्यानंतर त्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिक नफा झाल्य़ास त्यावर 10% कर लागत होता.


निवडणुकीचं वर्ष असल्याने सरकार बजेटमध्ये शेतकरी आ णि ग्रामीण वर्गासाठी मोठी घोषणा करु शकते. यामुळे ग्रामीण भारतामध्ये पैशांचा प्रवाह वाढेल. अर्थात, लोकांना गावांमध्ये खर्च करण्यासाठी अतिरिक्त पैसे असतील आणि यामुळे ग्रामीण भागातून मागणीत वाढ होईल.


एफएमसीजी सेक्टरला फायदा


याव्यतिरिक्त, अशी अपेक्षा केली जाते की सरकार आयकर स्लॅबमध्ये सवलत देऊ शकते. मध्यमवर्गाजवळ खर्च करण्यासाठी अधिक पैसे असतील. यामुळे एफएमसीजी, कंज्युमर ड्युरेबल्स आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रात मागणी वाढू शकते. यामुळेच गुरुवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.