मुंबई : शेअर बाजारात अनेक शेअर्सचा परफॉमन्स आश्चर्यकारक आहे. ऑर्चिड फार्मा (Orchid Pharma)असाच एक शेअर आहे, ज्याने मागील 5 महिन्यांत जवळपास 10 हजार टक्के परतावा दिला आहे. या शेअरमध्ये पैसा लावणे योग्य राहील का जाणून घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑर्चिड फार्मा हा शेअर गेल्यावर्षी 3 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात 18 रुपयांवर रीलिस्ट झाला होता. शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर 1532 रुपयांवर बंद झाला आहे. तर बुधवारी या शेअरने 1787 रुपयांपर्यंत मजल मारली होती.  गेल्या पाच महिन्यात ऑर्चिड फार्माने आपल्या शेअर धारकांना 9827 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या दरम्यान सेन्सेक्सने फक्त 21.56 टक्के इतका परतावा दिला आहे.


प्रमोटर्सची भागिदारी
शेअर मार्केटमध्ये रीलिस्ट झाल्यानंतर हा शेअर सलग अनेकवेळा अप्पर सर्किटवर लागत होता. या शेअरमध्ये लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे कंपनीचे प्रमोटर धानुका लॅबोरेटरीजची यात 98 टक्के भागिदारी आहे. शेअर मार्केटमध्ये व्यवहारांसाठी या कंपनीचे फार थोडे शेअर शिल्लक आहेत. 


कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, प्रमोटर आपले काही शेअर्स गुंतवणूकदारांना विकण्याच्या तयारीत आहेत. सेबीच्या नियमांनुसार कंपनीच्या प्रमोटर्सने शेअरच्या लिस्टींगनंतर 3 वर्षांच्या आत भागिदारी कमी करत 75 टक्क्यांपर्यंत आणणे बंधनकारक आहे.


शेअर्समधल्या वाढीमुळे शंका
तज्ज्ञांच्या मते चैन्नईमध्ये मुख्यालय असलेली या कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहता शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ न्यायिक वाटत नाही. कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. कंपनीने संशोधन क्षमतेत बरीच गुंतवणूक केली आहे. पुढील 6 ते 12 महिने नफा होण्याची आशा आहे.