मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जागातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. मंगळवारी बाजार उघडताच मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक 1200 अंकानी घसरला तर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक 265 अंकांनी घसरला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रशियाने युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वायत्त देशांची मान्यता दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून अमेरिका रशिया आणि पूर्व युक्रेनपासून वेगळ्या झालेल्या देशांवर कारवाई करू शकते. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली.


त्याचाच परिणाम म्हणून भारतीय शेअर मार्केटचीही मोठ्या अंकांनी पडझड झाली. सकाळी 9.18 वाजेपर्यत निफ्टी 16940 अंकांवर तर सेंन्सेक्स 56438 अंकांवर ट्रेड करीत होता.