Shark Tank New Judge Vikas D Nahar : वाळूचे कण रगडता तेलही गळ... या म्हणीचा थोडक्यात अर्थ म्हणजे आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, महेनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. अशाच एका व्यक्तीची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तब्बल 20 वेळा अपयश पचवले! पण, शेवटी 500 कोटींची कंपनी उभी केलीच. या व्यक्तीचे नाव आहे विकास डी नहार (Vikas D Nahar). विकास आता शार्क टँक इंडिया  (Shark Tank India) या टीव्ही शो (Tv show) चे जज अर्थात परिक्षक होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास डी नहार हे हॅपिलोचे (Happilo) सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. हॅपिलो ही कंपनी पौष्टिक स्नॅक्स विशेषतः ड्रायफ्रूट व्यवसायाशी संबंधित आहे. नहार हे शार्क टँक इंडिया जज होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली बिझनेस जर्नी सांगितली आहे. 


20 वेळा अपयश पचवलं


आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. मी आयुष्यात 20 वेळा अयशस्वी झालो. पण, मी हार मानली नाही. प्रत्येक वेळी नव्या जोमाने उभा राहिलो. स्वत:च्या मनाने निर्णय घ्या आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा. तुम्हा यश नक्की मिळेल असे विकास डी नहार म्हणाले. विकास डी नहार यांनी हॅपिलो ही कंपनी अवघ्या 10,000 रुपयांमध्ये सुरू केली, आज हापिलो कंपनीची 500 कोटींची उलाढाल आहे. देशभरातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि किरकोळ स्टोअर्समध्ये हॅपिलो कंपनीचे प्रोडक्ट पहायला मिळतात. 


 



शार्क टँक इंडियामुळे बिझनेस आयडीयाला मिळतेय बळ 


शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन सुरू आहे. या शोच्या स्वरूपामुळे त्याची लोकप्रियता अफाट आहे.  टीव्हीवर  हा शो प्रचंड फेमस झाला आहे. या शो मुळे अनेकांना व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली आहे.  आपणही नोकरीपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो अशी भावना अनेकांच्या निर्माण झाली आहे. आपणही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो असा आत्मविश्वास मिळत आहे. या शोमध्ये लहानांपासून ते वयस्कांपर्यंत अनेकांनी हजेरी लावली. कार्यक्रमातील शार्क्सकडून स्वतःच्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवण्याचा प्रयत्न केला. या शो च्या माध्यमातून काही प्रसिद्ध उद्योजक घरा-घरांमध्ये पोहोचले आहेत. भारतात Shark Tank India चा पहिलाच सिझन सुपर हिट ठरला.  शार्क इंडियाचा दुसरा सीझन 23 जानेवारी 2023 पासून सुरु झाला आहे. सध्या अमन गुप्ता, अमित जैन, अनुपम मित्तल, नमिता थापर, पियुष बन्सल आणि विनिता सिंग दुसऱ्या सीझनमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहेत.