बिल्किस बानो (bilkis bano) सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेशी सामूहिक बलात्काराच्या दोषींच्या सुटकेनंतर देशात वातावरण तापलं आहे. अशातच काँग्रेस (Congress) खासदार शशी थरूर (shashi tharoor) यांनी त्यांच्या माजी सहकारी आणि भाजप नेत्या खुशबू सुंदर (khushbu sunder) यांचे कौतुक केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुशबू सुंदर यांनी या प्रकरणात न्यायाची मागणी करणारे ट्विट केले होते आणि दोषींची सुटका हा मानवजातीचा आणि स्त्रीत्वाचा अपमान असल्याचे म्हटले होते. याच संदर्भात शशी थरुर यांनी भाजप नेत्यांचे समर्थन केलं आहे.


2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व अकरा दोषींना गुजरात सरकारने सोडले होते. त्यानंतर काँग्रेसने या संदर्भात प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 


मात्र गुजरात सरकारच्या या निर्णयावर टीका करताना भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी  अशा घटना म्हणजे मानवजातीचा आणि स्त्रीत्वाचा अपमान आहे, असे म्हटले आहे.


आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी रिट्विट करत भाजप नेत्याचे कौतुक केले आहे. भाजप नेते योग्य गोष्टीसाठी उभे राहिले याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "खुशबू सुंदर! तुम्हाला योग्य गोष्टीसाठी उभे असल्याचे पाहून अभिमान वाटतो," असे थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



खुशबू सुंदर यांनी बिल्किस बानो प्रकरणासंदर्भात ट्विट केलं होतं. "ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे, तिच्यावर अत्याचार झाला आहे आणि तिच्या आत्म्याला आयुष्यभरासाठी जखमा झाल्या आहेत, तिला न्याय मिळाला पाहिजे. यात जो कोणी पुरुष असेल, त्याला शिक्षा झाली पाहिजे. जर असे घडत असेल तर हा स्त्रीत्वाचा अपमान आहे. बिल्किस बानो किंवा कोणत्याही स्त्रीला राजकारण आणि विचारसरणीच्या पलीकडे समर्थनाची गरज आहे," असे खुशबू सुंदर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.