मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भाजपमधील एक प्रबळ नेते आहेत. मात्र, त्यांच्या नेतृत्वाबद्दल पक्षात मोठी नाराजी पसरत चालली असून, अनेक नेते आता उघडपणे टीका करू लागले आहेत. भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच मोदींवर जोरदार निशाणा साधला. हा निशाणा साधताना सिन्हांनी मोदींचा थेट उल्लेख टाळला आहे.


विजयाचे श्रेय तर सर्वच घेतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधतान शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे की, निवडणुकांत विजय झाल्यावर श्रेय सर्वच जण घेतातल. पण, पराभवाची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल सिन्हांनी उपस्थित केला आहे.


एका म्हणीचा वापर करत सिन्हांनी म्हटले आहे की, 'आशा है कि इच्छा और प्रार्थना करें कि हम केवल गुजरात चुनावों में ही तालियों को प्राप्त करें। जय हिन्द'. विशेष असे की, सिन्हांचे हे ट्विट राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनीही रिट्विट केले आहे. 



 



महोदय, स्वच्छ आणि आरोग्यदायी राजकारणाकडे परता


दरम्यान, शत्रुघ्न सिन्हांनी या पूर्वीही मोदींवर निशाणा साधला आहे. 'महोदय, नव्या नव्या कहाण्या रचून आरोप करण्यापेक्षा थेट मुद्द्यांवर चर्चा करा. जी आश्वासने आम्ही जनतेला दिली होती जसे की, घर, रोजगार, आरोग्य, शिक्षण, विकास मॉडेल आदी. जातियता पसरवणारे वातावरण थांबवा आणि स्वच्छ आणि आरोग्यदायी राजकारणाकडे परता. जय हिंद!', असे मागच्या वेळी सिन्हांनी म्हटले होते.