Sheena Bora Murder Case : मोठी बातमी! शीना बोरा अजूनही हयात?
Sheena Bora Murder Case : बहुचर्चीत शीना बोरा हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. शीना बोरा अजूनही जिवंत आहे...मग खरचं शीनाची हत्या झाली होती की नाही असा सवाल उपस्थित राहत आहे.
Sheena Bora case: शीना बोरा हत्या प्रकरणात (Sheena Bora Murder Case) आताची मोठी बातमी समोर आली आहे. शीना बोरा हिची खरंच हत्या झाली का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjee) हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती. शीना बोराचा मित्र आणि तिचा होणारा पती राहुल मूखर्जी (Rahul Mukherjee) याने वरळी पोलीस ठाण्यात 2012 मध्ये तक्रार केली होती की शीना ही बेपता आहे. मात्र त्याची तक्रार घेतली नव्हती. 23 मे 2012 ला महाराष्ट्रातील रायगडमध्ये पोलिसांना एक सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, तर तो मृतदेह सीबीआयने (CBI) हा शीना बोराचा असल्याचा दावा केला गेला. तर इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjee) यांच्या ड्रायव्हरचा जवाब घेतला.
मात्र आता शीना बोरा हत्याप्रकरणी (Sheena Bora Murder Case) इंद्राणी मुखर्जीने नवीन दावा केला आहे. गुवाहाटी विमानतळावर (Guwahati Airport) शीना बोरासारखी मुलगी दोन वकिलांना दिसल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी हिने विशेष न्यायालयात केला. इंद्राणीचा हा दावा खोटा असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) न्यायालयाला सांगितले. मात्र न्यायालयाने इंद्राणीचा अर्ज स्वीकारत विमानतळावरील 5 जानेवारीचे सीसीटीव्ही फुटेज (cctv) सादर करण्याचा आदेश गुवाहाटी विमानतळ प्राधिकरणाला गुरूवारी (12 जानेवारी 2023) दिला.
दरम्यान विमानतळावर शीना बोरासारखी दिसलेल्या मुलीची माहित व विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यासाठी इंद्राणीने गेल्या शुक्रवारी (6 जानेवारी 2023) विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सीबीआयने त्यावर आक्षेप घेतला. कारण काही महिन्यांपूर्वीही इंद्राणीने असाच दावा केला होता की, श्रीनगरमध्येही शीना बोरासारखी मुलगी दिसली होती. इंद्राणी केवळ न्यायालयाची दिशाभून करून खटल्यास विलंब करत असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले आहे.
इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा
याआधीही शीना बोराच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने खळबळजनक दावा केला होता. शीना जिवंत आहे, तपासयंत्रणांनी तिचा शोध घ्यावा, असं पत्र इंद्राणीने CBI ला लिहिलं होतं. शीना बोरा हिचा तपास काश्मिरात करावा, असंही तीने म्हटलं होतं. या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करीत आहे.
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण?
टीव्ही इंडस्ट्रीमधील नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी आणि मीडिया टायकून म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी (Peter Mukharjee) यांची शीना बोरा ही मुलगी. शीना बोरा पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली. इंद्राणी मुखर्जीने एका कारमध्ये गळा दाबून शीनाची हत्या केल्याचा जबाब तिच्या ड्रायव्हरने दिला होता. याप्रकरणी इंद्राणी आणि तिचा पहिला पती संजीव खन्ना याला अटक करण्यात आलं. मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट केल्याच्या प्रयत्नात संजीव खन्नाला अटक करण्यात आली.
पीटर मुखर्जी (Peter Mukherjee) हा इंद्राणीचा दुसरा पती. पीटर मुखर्जी याचा मुलगा राहूल आणि शीना बोरा यांच्या जवळीक होती. 2012 नंतर शीना अचानक बेपत्ता झाल्यानंतर राहुलने तिचा खूप शोध घेतला. पण यानंतर शीनाची हत्या झाल्याचं समोर आलं. इंद्राणीने शीनाचा कारमध्ये गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यात पुरल्याचं उघड झालं. शीनाचे अवशेषही केंद्रीय यंत्रणांना सापडले होते.