नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदावर सोनिया गांधींच्या जागी राहुल गांधींची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. मात्र, राहुल गांधींच्या उमेदवारीला पहिल्यापासून विरोध करणा-या शहजाद पुनावाला यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष नेतृत्वावर टीकास्त्र सोडलंय.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच कुटुंबातले पाच अध्यक्ष कसे होऊ शकतात असा प्रश्न शहजाद पुनावाला यांनी विचारलाय.


योगी आदित्यनाथ यांचाही काँग्रेसवर हल्लाबोल 


तर उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.


इतर कुणीच भरला नाही अर्ज 


काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची वेळ सोमवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती. मात्र, राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाहीये. त्यामुळे राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.



१९ वर्षांनंतर नवा अध्यक्ष


१९ वर्षानंतर काँग्रेसला राहुल गांधी यांच्या रुपात नवा अध्यक्ष मिळणार आहे.