मुंबई : दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणूकीत (Daddra Nagar Haveli Loks Sabha bypolls result) शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला. शिवसेनेचा उमेदवार कलाबेन डेलकर (Shiv Sena Kalaben Delkar wins) यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात दमदार विजय मिळवला आहे. शिवसेनेचा राज्याबाहेरचा हा पहिलाच विजय आहे. 


शिवसेना भवनसमोर विजयोत्सव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर मुंबई शिवसेना भवनसमोर शिवसैनिकांनी जल्लोष करत विजय साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे. महाराष्ट्राबाहेर सेनेचा उमेदवार जिंकला, ही खऱ्या अर्थाने आमच्यासाठी दिवाळी आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम आता राज्याबाहेरही पोहचत आहे अशी प्रतिक्रिया युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी दिली आहे.


दादरा नगर हवेलीतील जनतेचा विजय


दादरा नगर हवेलीतील जनतेचा हा विजय आहे, त्यांच्या हक्कासाठी यापुढेही लढत राहणार असल्याचं आश्वासन शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर यांनी दिलं आहे. मोहन डेलकर यांच्याबरोबर जो अन्याय झाला आहे त्याविरोधात लढत राहणार असल्याचंही कलाबेन डेलकर यांनी म्हटलं आहे. 


शिवसेनेचं सिमोल्लंघन


शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर दमदारपणे आपलं पाऊल टाकलं आहे, दादरा नगर हवेलीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा ध्वज आज महाराष्ट्राबाहेर गेला आहे. एक शिवसैनिक म्हणून आपल्यासाठी ही आंनदाची गोष्ट असल्याची प्रतक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 


डेलकर कुटुबांच्या पाठिशी शिवसेना


हुकुमशाहीला कंटाळून मोहम डेलकर यांनी मुंबईत आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आपल्या पत्रात जी भावना व्यक्त केली होती, की मला महाराष्ट्रातून न्याय मिळेल, म्हणून महाराष्ट्रात आलो, महाराष्ट्राने त्यांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांच्या आत्महत्येसंदर्भात एसआयटी तपास सुरु आहे, शिवसेनाही त्यांच्या कुटुंबांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आता शिवसेनेचे 22 खासदार दादरा नगर हवेलीचे प्रश्न घेऊन उभे राहितील, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.