मुंबई : टीडीपीने एनडीएतून काढ्ता पाय घेतला असून आज ते सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल करणार आहेत. याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. 


चर्चा सुरू आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारवर अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत शिवसेनेचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पक्ष याबाबत चर्चा करत आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीये. 


ओवेसींचा पाठिंबा



दरम्यान, एमआयएमचे प्रमुख्य असदुद्दीन ओवेसी यांनीही याला पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात हा अविश्वास ठराव आहे. तसेच रोजगार निर्मितीतील त्यांचं अपयश, महिला सुरक्षा देण्याबाबतचं अपयश या विरोधात हा अविश्वास आहे, असेही ते म्हणाले.