मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीरा आईचे दर्शन घेतले. आता उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांना घेऊन अयोध्येत प्रभु रामाच्या दर्शनास जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांआधी शिवसेनेने राम मंदीर बांधणीसाठी अयोध्यावारी केली होती. आता निवडणुकीत भाजपासोबत एकत्र लढल्यानंतर आणि पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही अयोध्यावारी होणार आहे. त्यामुळे राम मंदीराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेना नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत जाण्याच्या तयारील लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 खासदार अयोध्येत जाणार आहेत. 15 जूनला शनिवारी उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार राम लल्लाचे दर्शन घेतील. एकवीरा देवी आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला अयोध्येत पोहोचतील. शिवसेना सर्व विजयी खासदारांसह राम लल्लाचं दर्शन घेणार आहे. या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंखणार असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.