मुंबई : Maharashtra Political Crisis  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परिस्थिती जैसे थे ठेवली जावी यासाठी शिवसेना नेते सुनिल प्रभु यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी तिन्ही पक्षांना वेळ देण्यात आला आहे. पाच दिवसांत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.


मात्र या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने 11 जुलैची असेल असं स्पष्ट केले आहे. या सुनावणीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात बंडखोर आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यातच आता 11 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.


आता शिवसेनेने बहुमत चाचणीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं यावर महाविकास आघाडी सरकारचं भविष्य अवलंबून आहे.