नवी दिल्ली : बॉलिवूडचा नायक अमिताभ बच्चन यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा असा काही डायरेक्ट संबंध नाही. मात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तिघे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे असं म्हटलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे की, अमिताभ, नेताजी आणि शास्त्री हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. या संशोधनात संशोधकाने बंगाली कुलीन कायस्थ कुटुंबाच्या इतिहासापासून ते अगदी त्यांच्या जीन्सपर्यंत पोहचून विश्लेषण केले आहे. 


असा आहे नेताजी आणि शास्त्रीजी यांच्याशी संबंध 


असं सांगितलं जातं की, शेकडो वर्षांपूर्वी उत्तर भारतातील कन्नौजमधून पाच कुलीन कायस्तांनी पलायन केले होते. यांच्यासोबत पाच ब्राम्हणांनी देखील पलायन केले होते. आणि हे सर्वजण पश्चिम बंगालमध्ये जाऊन स्थिरावले. आणि पलायन केलेले बंगालमध्ये स्थिरावल्यानंतर हे कायस्त बोस, घोष, मित्रा दत्ता आणि गुहा झाले. त्याचप्रमाणे मुखर्जी, बॅनर्जी यासारखे पलायन करणारे लोकं हे ब्राम्हणांचे वंशज असल्याचे सांगितले जाते. 


अध्ययनानुसार पश्चिम बंगालचे बोस आणि उत्तर प्रदेशचे श्रीवास्तव हे खरं म्हणजे एकाच कुंटुंबातील व्यक्ती आहेत. आणि एकाच परिवारातील हिस्सा आहेत. तर याचा अर्थ तोच आहे की अमिताभ बच्चन माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि सुभाष चंद्र बोस हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.