दोन डोकं, तीन हात.... जन्माला आलं अनोखं बाळ; कारण अतिशय धक्कादायक
जन्माला आलं अनोखं बाळ; कारण अतिशय धक्कादायक
मुंबई : एका महिलेने अनोख्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाला दोन डोकं, तीन हात आहेत. विज्ञानाचं हे वेगळं रूप पाहण्यासाठी रूग्णालयात गर्दी होत आहे. सध्या हे बाळ आयसीयुमध्ये दाखल आहे. डॉक्टरांच म्हणणं आहे की, करोडो नवजात बालकांपैकी एका बाळ असं जन्माला येतं.
मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रूग्णालयात अशा असाधारण मुलाचा जन्म झाला आहे. शाहीन असं या बाळाच्या आईचं नाव आहे.
या बाळाला दोन डोकं, तीन हात आहेत. बाळाचा तिसरा हात दोन चेहऱ्यांच्या पाठीमागे आहे. मुलाला काही काळ रतलामच्या एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आता तेथून त्याला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.
डॉ.नावेद कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार, असे कमी गर्भ जगतात. अनेकदा गर्भातच त्यांचा प्रवास संपतो. तसेच जर असं बाळ जन्माला आलं तरी त्यांचा जीवनकाळ हा अवघा ४८ तासांचा असतो.
दोन डोकं जन्माला आलेलं बाळ ही आताची काही पहिली घटना नाही. ऑपरेशन केल्यानंतरही अशी बाळ जगण्याचं प्रमाण कमी आहे.