Idli Eating Competition: केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला इडली खातानाच मृत्यू झाला आहे. इडली जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ओणम उत्सव होता. त्या दरम्यान एका कार्यक्रमात खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी ईडली खात असतानाच श्वास लागल्याने घुसमटून एका 49 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक क्लबकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुरेश नावाच्या एका व्यक्तीने भाग घेतला होता. स्पर्धे जिंकण्याच्या नादात त्याने खूप जास्त इडली खाल्ल्या होत्या. त्यामुळं खाताना त्याचा श्वास कोंडला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याचा वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घशात अडकलेली इडली काढायचा प्रयत्न केला.


सुरेश याची तब्येत अधिक बिघडल्याने त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. वायलार पोलिसांनी या प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेणं या व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे. 


दरम्यान, खाण्यामुळं जीव गमावल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. काही दिवसांपूर्वी झारखंड येथेही असाच प्रकार उघडकीस आला होता. पूर्वी सिंहभूम येथे रसगुल्ला खाताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन अमित सिंह याचा मृत्यू झाला होता. अमित सिंह याचे काका रोनी सिंह हे ओडिशाच्या अंगुलमध्ये नोकरी करत होते. जवळपास 3 महिन्यांनी ते घरी परतले होते. काका घरी आल्याच्या आनंदात अमित त्यांना आणण्यासाठी रेल्वे स्टेशनला गेला होता. परतताना त्याने रसगुल्ला आणला होता. 


रस्सगुल्ले वाटत असताना उत्साहात त्यानेदेखील दोन ते तीन रसगुल्ले खाल्ले. तेव्हा अचानक एक रसगुल्ला त्याच्या घशात अडकला त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तेव्हा नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.