लग्नाच्या रात्री घडला असा प्रकार, नववधू थेट पोहोचली पोलीस स्टेशनात... नक्की असं काय घडलं?
या नववधूने आपल्या लग्नाची स्वप्ने सजवली होती, पण तिला हे कुठे माहित होतं की, ज्या रात्री तिला सात फेरे घ्यायचे आहेत. ती रात्र तिला पोलिस स्टेशनमध्ये घालवावी लागेल.
मुंबई : आपल्या लग्नाचं स्वप्न प्रत्येक मुलगी रंगवते. या दिवशी सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे आणि चांगल्या व्हाव्यात अशी तिची इच्छा असते. म्हणून ती खूप आधीपासून यासाठी तयारी सुरु करते. नवीन लोक, नवीन प्रथा नवीन संसार यामुळे आधीच मुलींच्या मनात वेगवेगळे प्रश्न फिरत असतात. नवऱ्यासोबत आणि घरच्यासोबत जुळवून घेण्यासाठी देखील ती बऱ्याच गोष्टींचा विचार करत असते. परंतु अशाच विचारात एक मुलगी असताना तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला. ज्यामुळे तिच्यावर रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये राहण्याची वेळ येते.
खरंतर या नववधूने आपल्या लग्नाची स्वप्ने सजवली होती, पण तिला हे कुठे माहित होतं की, ज्या रात्री तिला सात फेरे घ्यायचे आहेत. ती रात्र तिला पोलिस स्टेशनमध्ये घालवावी लागेल.
हे प्रकरण कुशीनगरचे आहे, जिथे हुंड्यामुळे लग्न मोडले आहे. खरं तर संपूर्ण कुटुंबासह वधूला पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन करावे लागले. तिच्या हातातील मेहंदीचा रंग भलेही उजळ दिसत होता. पण तिचं आयुष्य मात्र याप्रकरणाने बेरंग झाले आहे. तिच्या सोबत हा सगळा प्रकार घडण्यामागे कारण होते हुंड्याची मागणी. ज्यामुळे नववधूवर अशी वेळ आली.
प्रकरण जिल्ह्यातील बैरिया येथील आहे, जिथे वराच्या बाजूने अचानक हुंड्याची मागणी केल्याने विवाह सोहळ्याचे वादात रूपांतर झाले. त्यामुळे सासरे जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नववघूवर पोलिस स्टेशनमध्ये बसण्याची वेळ आली.
नक्की काय आहे हे प्रकरण
हे प्रकरण कसया पोलीस ठाण्याच्या बैरिया भागात असलेल्या एका लग्न घराशी संबंधित आहे, जिथे बरवा जंगलातून एक मिरवणूक बलजीत सिंगच्या घरी आली होती. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. मात्र जयमालानंतर लग्नाच्या दुसऱ्या विधी सुरू होताच मुलाच्या बाजूचे लोक हुंड्याच्या मागणीवर उतरले. याआधीही वीस लाख रुपये हुंडा म्हणून दिले होते, मात्र नंतर आणखी दहा लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
त्याचवेळी या प्रकरणी वराकडच्यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर पोलीसही याप्रकरणी काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र, याप्रकरणी दोन्ही बाजूंमध्ये तोडगा निघणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.