Shocking News : मुलांच्या स्कूल बॅगमध्ये वह्या पुस्तकांशिवाय दुसरं काय सापडणार असंच प्रत्येकाला वाटेल. मात्र, बेंगळुरूच्या(bangalore) शाळांमध्ये मुलांच्या दप्तरात अत्यंत धक्कादायक वस्तु सापडल्या आहेत. मुलांच्या स्कूल बॅग चेक करताना सापडलेल्या वस्तू पाहून शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली. अनेक विद्यार्थी मोबाईलफोन शाळेत आणत होते. मोबाईल ते स्कूल बॅगमध्ये लपवत होते. यामुळे अचानक सर्व विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग चेक करण्यात आल्या. यावेळी सापडलेल्या वस्तु पाहून शिक्षक हैराण झाले.   मुलांच्या स्कूल बॅगमध्ये कंडोम( Condoms), गर्भनिरोधक गोळ्या( birth control pills) सापडल्या आहेत. इतकच नाही तर काही मुलांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये दारु(liquor) भरलेली होती. तर काहीच्या जेवणाच्या डब्यांमध्ये ड्रग्जचा(drugs) अंश असणाऱ्या गोळ्या देखील सापडल्या आहेत. हे सर्व विद्यार्थी इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या  वर्गात शिकणारे आहेत. या वस्तु पाहून शिक्षकांना धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेत मोबाईल आणण्यावर बंदी आहे. असे असताना अनेक विद्यार्थी मोबाईल घेवून शाळेत जातात. कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संबंधित व्यवस्थापनांनीही मुलांकडे मोबाईल सापडल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने अनेक शाळांमध्ये मुलांच्या स्कूल बॅग तपासण्यात आल्या. मात्र, तपासणी दरम्यान मोबाईलसह अनेक धक्कादायक वस्तु मुलांच्या स्कूल बॅगमध्ये सापडल्या आहेत. 


तपासणी दरम्यान मुलांच्या दप्तरांमध्ये कंडोम, ipil अर्थात गर्भनिरोधक गोळ्या तसेच नशावर्धक पदार्थ सापडले. तसेच काही मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारु देखील भरलेली होती. जवळपास 80 टक्के शाळांमध्ये अशा प्रकारे स्कूल बॅगची चेकींग करण्यात आल्याची माहिती कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या असोसिएटेड मॅनेजमेंटचे सरचिटणीस डी शशी कुमार यांनी दिली. 


या प्रकारानंतर तात्काळ शाळांमध्ये पालक सभा घेवून पालकांना याबद्दल सूचित करण्यात आले. ज्या मुलांच्या बॅगांमध्ये अशा प्रकारच्या वस्तु सापडल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. याकरिता अनेक शाळांनी मुलांना दहा दिवसांची सुटी देखील दिली आहे.