CNG-PNG Rate Hike : सर्वसामान्यांना महागाईचा धक्का देणारी बातमी. महानगर गॅसने (Mahanagar Gas) सीएनजी (CNG) आणि पाईप गॅसचे (PNG) दर वाढवले आहेत. सीएनजीमध्ये प्रति किलो 1.50 रुपयाने दरवाढ तर तर पाईप गॅसच्या किंमतीत 1 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. नव्या दरानुसार आता सीएनजीची किंमत 75 रुपये प्रति किलो तर घरगुती गॅसची किंमत 48 रुपये प्रति SCM होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात इंधन दरवाढीसोबतच सीएनजी गॅसमध्येही वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किंमतीत मुंबईत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. सीएनजीच्या किमतीत किलोमागे 1.50 रुपये तर पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमतीत 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 


पेट्रोल डिझेलनं शंभरी गाठल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा सीएनजी गाड्यांकडे वळवला होता. तुलनेनं स्वस्त असल्यामुळे लोक सीएनजी गाड्यांना प्राधान्य देत होते. पण, पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीदेखील शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहचत आहे. कारण, आता पुन्हा एकदा मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे अगोदरच महागाईचे चटक सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी भार सोसावा लागणार आहे. 


गेलने सिटी गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या असून त्याचा बोजा सर्वसामान्य मुंबईकरांवर पडणार आहे.