Kushboo Sundar : मी फक्त 8 वर्षांची होते अन् त्यांनी.... भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे वडिलांवर गंभीर आरोप
Kushboo Sundar : दाक्षिणात्य अभिनेत्री ते राजकारण आणि आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या असा प्रवास खुशबू सुंदर यांनी केला आहे. मात्र महिला आयोगाच्या सदस्या बनताच त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या खुलाश्यामुळे खळबळ उडाली आहे
Kushboo Sundar Shockingly Reveals : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. अभिनेत्रीतून राजकारणी बनलेल्या खुशबू सुंदर या नुकत्याच राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) सदस्या बनल्या आहेत. अशातच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत भाष्य केले आहे. खुशबू सुंदर यांनी त्यांच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. आठ वर्षांच्या असल्यापासून खुशबू सुंदर यांचे वडील त्यांचं लैंगिक शोषण (physically abused) करत होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये खुशबू सुंदर यांनी हे धक्कादायक गुपित उघड केले आहे. 8 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी शारीरिक आणि लैंगिक शोषण केले होते, असे खुशबू सुंदर म्हणाल्या. खुशबू सुंदर यांनी नुकताच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याचा पदभार स्वीकारला आहे आणि अनेक कारणांमुळे त्या नेहमी चर्चेतही असतात. त्यातच आता या नव्या खुलाश्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
आईनेही भयंकर कौटुंबिक हिंसेचा सामना केला
"मला वाटतं जेव्हा एखाद्या मुलावर किंवा मुलीवर अत्याचार होतो तेव्हा तो जो एक डाग असतो आयुष्यभरासाठी असतो. तेव्हा मुलगा असो की मुलगी याने काही फरक पडत नाही. माझ्या आईने भयंकर कौटुंबिक हिंसेचा सामना केला आहे. तिने एका अशा पुरुषाशी संसार केला, ज्याला वाटायचं की त्याचा पत्नीला आणि मुलांना मारहाण करणं हा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्याला हे ही वाटायचं की त्याच्या एकुलत्या एक मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा त्याला अधिकार आहे. माझ्यासोबत अत्याचार सुरू झाला तेव्हा मी फक्त 8 वर्षांचा होते आणि 15 वर्षांची असतानाच मला त्याविरुद्ध बोलण्याची ताकद मिळाली," असे खुशबू सुंदर म्हणाल्या.
कोण आहेत खुशबू सुंदर?
खुशबू सुंदर या दक्षिणेतील अभिनेत्री आहेत. मात्र लहाणपणी त्यांनी खूप अडचणींचा सामना केला. त्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवले आणि मोठं यश मिळवसे. द बर्निंग ट्रोनमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2010 मध्ये सुंदर यांनी राजकारणात प्रवेश केला. 2020 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.