Viral Video : मध्य प्रदेशातील उज्जैन स्टेशनवर झालेल्या अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे. एका आईने आपल्या पोटच्या दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकून दिलं आणि नंतर स्वतःही उडी घेतली. सुदैवाने  प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबलने जीवाची बाजी लावत महिला आणि तिच्या मुलांचा जीव वाचवला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
एक महिला घाईगडबडीत चुकीच्या ट्रेनमध्ये चढली. ट्रेन सुरू झाल्यानंतर तिला हा प्रकार कळला आणि ती घाबरली. तोपर्यंत ट्रेन सुरु झाली होती. घाबरलेल्या महिलेने कोणताही विचार न करता आधी आपल्या मोठ्या मुलाला आणि नंतर धाकट्या मुलाला चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर फेकलं.


सुदैवाने त्याच डब्याजवळ कॉन्स्टेबल महेश कुशवाह उभे होते. त्यांनी ही घटना पाहिली आणि तात्काळ मदतीला धावले. त्यांनी दोन्ही मुलांना आधी वाचवलं. यादरम्यान महिलेनेही चालत्या ट्रेनमधून उडी मारली. ती ट्रेन खाली जाण्याआधीच कॉन्स्टेबल महेशने त्या महिलेला प्लॅटफॉर्मवर खेचलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जीआरपी कॉन्स्टेबल महेश कुशवाह यांना त्यांच्या कर्तुत्वासाठी बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.



ही घटना शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नी आणि मुलांसह एक व्यक्ती उज्जैन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचला. त्याला फलाट क्रमांक 1 वर जायचं होतं. सर्वजण सिहोरला जात होते. कुटुंबाला स्टेशनवर सोडून नवरा तिकीट काढायला गेला. त्याचवेळी जयपूर-नागपूर एक्स्प्रेस गाडी स्थानकावर आली. महिलेला वाटलं की आपल्याला या ट्रेनने जायचं आहे, म्हणून ती घाईघाईत मुलांसह ट्रेनमध्ये चढली. 


ट्रेनमध्ये चढल्यानंतर महिलेला आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याचं समजलं. पण तोपर्यंत ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडलं होतं. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने आपल्या मुलांसह चालत्या ट्रेनमधून उडी घेतली.