भीषण अपघाताचा महाभीषण व्हिडीओ... डोळ्याची पापणी लवते ना लवते तोवर समोरच्या व्यक्ती गायब....
या व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक माणूस ( man standing on road) पाहायला मिळतो. एक गाडी येते आणि माणसापाशी थांबते
Viral CCTV of Accident: काळ आलेली पण वेळ आला नव्हता.. मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला हे आपण कायम ऐकतो, वाचतो आणि पाहतो देखील. मात्र प्रत्येकजण एवढे नशीबवान नसतात. अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या अशा काही घटना असतात ज्याने त्या व्यक्तीसोबत जे घडतं ते भीषण असतंच. सोबतच्या व्यक्तीवरही त्याचा गंभीर मानसिक परिणाम होत असतो. तसाच तो कायम देखील राहतो. असाच एक भीषण अपघात CCTV मध्ये कैद झालाय. हा अपघात एवढा भीषण ( Shocking Accident) होता की ज्याच्या अपघात झाला त्याला तर काही समजलं नसेलच. त्याच्यासोबत जे होते त्यांनाही काहीच समजला नाही. कारण आता डोळ्यासमोर असणारी कार डोळ्याची पापणी लवते तोवर गायब झालेली. होता तो फक्त भीषण आवाज...
या व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक माणूस ( man standing on road) पाहायला मिळतो. एक गाडी येते आणि माणसापाशी थांबते. रस्त्याजवळ उभा माणूस गाडीच्या डिक्कीजवळ जातो आणि बहुदा गाडीत बॅग ठेवतो. गाडीतून तीन माणसं बाहेर पडतात. यातील एक सीटवर बसायला जातो. दोघे कारपाशी असतात आणि एक डिक्कीत सामान ठेवत असतो. कदाचित ही मंडळी कुठेतरी छान फिरायला जात असावी. ते एकमेकांसोबत बोलतच होते, तोवर मागून भयंकर वेगाने एक गाडी येते आणि डिक्कीत सामान ठेवणाऱ्या सोबतच गाडीत पुढे बसलेल्या माणसाला क्षणात उडवते. या गाडीचा ड्रायव्हर या गाडीत असावा ( Road Accident). डोळ्याची पापणी लवते तोवर समोरची गाडी आणि त्याच्या आसपासची माणसं गायब होतात.
हेही पाहा : Trending : मासा आणि मगरीचं घनघोर युद्ध... पण निकाल लागला अनपेक्षित.. पाहा व्हिडीओ
पाहा व्हिडीओ:
कारच्या बाजूला उभ्या दोघांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांना काहीही झालं नाही. मात्र कारच्या डिक्कीजवळील आणि कारमध्ये बसलेल्यांचं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. हा व्हिडीओ 20121 चा असल्याचं समजतं. ही माणसे बचावली असतील अशी आशा करूयात.