मुंबई : उद्योजक आनंद महिंद्रा नेहमीच सोशलमीडियावर ऍक्टिव्ह असतात.  आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सोशलमीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एक बदक थेट दोन वळूंना आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. 


खुल्या मैदानात अजस्त्र वळूंना भिडला छोटासा बदक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानाच्या मध्यभागी एकटे उभे असलेले बदक स्वतःपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या बैलांशी भांडत असताना दिसत आहे. ते बैल त्या बदकाला घेरून उभे असतात. एवढेच नाही तर ते बैल बदकावर सतत हल्ला करत राहतात, तर तेथून पळून जाण्याऐवजी बदक थेट त्या बैलांना भिडतो.



हा बदकदेखील बैलावर थेट आपल्या चोचीने हल्ला चढवतो. छोटासा बदक आक्रमकपणे बैलांना आव्हान देऊन मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा खूप प्रेरित झाले. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करून लोकांनाही प्रेरणा दिली.


आनंद महिंद्रा यांचे कॅप्शन


ट्विटरवर व्हिडिओ ट्विट करण्यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, '‘How’s the Josh, bird?’ ‘High sir, Ultra high’. That bird’s chutzpah is my #MondayMotivation'. 


आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ केवळ 8 सेकंदांचा आहे. परंतू त्याला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत असून तो आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.