मोहाली : पंजाबमधल्या अन्न आणि औषध रासायनिक प्रयोगशाळेच्या अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. परवान्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांना या प्रकरणी जलद चौकशीचे आदेश दिले आहेत. पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात अन्न आणि औषध रासायनिक प्रयोगशाळेच्या अधिकारी म्हणू डॉ. नेहा शौरी काम करत होत्या. त्यांची वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्याच कार्यालयात घुसून बलविंदर सिंग या आरोपीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात शौरी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बलविंदरनं स्वतःवरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. 


बलविंदर यांचं औषधांचं दुकान होते. अडीच-तीन वर्षांपासून ते बंद होते. या दुकानाच्या परवान्याबाबत असलेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांना या प्रकरणी जलद चौकशीचे आदेश दिले आहेत.